भारतीय हवाई दलाचा फ्रेंच हवाई दलासह 'एक्स-डेझर्ट नाईट' सराव

    24-Jan-2024
Total Views |

Indian Air Force exercises X Desert Night with French Air Force
 
 
मुंबई :
भारतीय हवाई दलाने (IAF) फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (एफ. ए. एस. एफ.) तसेच संयुक्त अरब अमिराती (यू. ए. ई.) हवाई दलासह डेझर्ट नाईट सरावा केला.
 
सरावात फ्रान्सच्या ताफ्यात राफेल लढाऊ विमान आणि बहुपयोगी टँकर वाहतुक प्रणालीचा समावेश होता, तर यु. ए. ई. हवाई दलाच्या ताफ्यात एफ-16 विमाने होती. ही विमानांचे कार्यान्वयन संयुक्त अरब अमिरातीमधील अल धफ्रा हवाई तळावरून केले जात होते.
 
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई-30 एमकेआय, मिग-29, जॅग्वार, एडब्ल्यूएसीएस, सी-130-जे आणि हवेतच इंधन भरु शकणाऱ्या एअर टू एअर रिफ्युएलर विमानांचा समावेश होता. भारतीय हवाई हद्दीतील सराव अरबी समुद्रावर आयोजित करण्यात आला होता. यात भारतीय हवाई दलाच्या विमानांचे कार्यान्वयन भारतातील तळांवरून करण्यात आले.
 
तिन्ही हवाई दलांमधील समन्वय आणि आंतरसंचालनीयता वाढवण्यावर डेझर्ट नाईट सरावाचा मुख्य भर होता. सरावादरम्यान झालेल्या संवादामुळे सहभागींमध्ये कार्यान्वयना बाबतचे ज्ञान, अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ झाली. भारतीय हवाई दलाचे कौशल्य दाखवण्यात व्यतिरिक्त, अशा प्रकारचे सराव या प्रदेशातील वाढत्या राजनैतिक आणि लष्करी परस्परसंवादाचे निदर्शक आहेत.