नागपूर :
अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफी व बी.आर. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी बी.आर. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल, साऊथ अंबाझरी रोड येथे कलाकारांनी संपूर्ण रामायणाचे एका श्लोकात सार असलेला ‘एक श्लोकी रामायण’ हा श्लोक ६५ × ४ फुट कॅनव्हासवर कॅलिग्राफी द्वारे अत्यंत सुंदररित्या साकारला.
अक्षरायन स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे संचालक राजीव चौधरी व संचालिका सरोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूने रामायणातील काही चित्रेदेखील यावेळी चित्रांकित केली. या उपक्रमात बी.आर. मुंडले व अंध विद्यालयातील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण रामायणाची कॅलिग्राफी असलेला हा ‘अक्षरसेतु’ चा कॅनव्हास रोल श्रीराम मंदिर न्यास, अयोध्या येथे भेट स्वरूपात दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर 7 हजार किलोचा श्रीराम हलवा तयार करण्यासाठी जाणार असून त्यावेळी हा अक्षरसेतु अयोध्येत प्रदर्शित केला जाईल. या संपूर्ण उपक्रमात संजय वानखेडे, संजीव मेंढे, विनायक गवळी, महेश राव, प्रियंका सावरकर, एकता गजभिये, मुकुल चवरे, हर्षल बारापात्रे व अनुराधा माथनकर यांचा सहभाग होता.