महारांगोळीद्वारे 100 कलाकारांनी आपली कला श्रीरामचरणी केली अर्पण

    22-Jan-2024
Total Views |
 
4000 sq ft maharangoli made by nagpur artists
 
नागपूर:
अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली आहे. दरम्यान नागपूरच्या इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल (आयपीएएफ), उत्तिष्ठ भारत आणि सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानावर महारांगोळी साकारण्यात आली होती.
 
4000 sq ft maharangoli
 
सूर्यवंशी श्रीराम, सीतामाई, परमभक्‍त श्री हनुमान, शरयू तीर, रामसेतू, मंगल तोरण, अक्षता कलश अशा प्रतिमांसह अहिल्‍याबाई होळकर, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रतिमा रांगोळीच्‍या माध्‍यमातून साकारण्यात आल्या.
 
4000 sq ft maharangoli
 
जवळपास 100 कलाकारांनी सलग सात तास अथक परिश्रम करीत 4 हजार चौ.फुटाची अतिशय सुरेख रांगोळी रेखाटली.
 
4000 sq ft maharangoli
 
100 किलो पांढरी व 400 क‍िलो विविधरंगी रांगोळीचा वापर करीत ही महारांगोळी तयार करण्यात आली आहे.
  
4000 sq ft maharangoli
 
सोमवारी सामाजिक कार्यकर्ते मनसुखभाई पटेल यांच्‍या हस्‍ते या महारांगोळीचे उद्घाटन करण्‍यात आले.
  
4000 sq ft maharangoli
 
रामभक्तीत मग्न होऊन संस्‍कार भारतीच्‍या कलाकारांनी आपली कला श्रीरामचरणी समर्पित केली आहे.