उत्तर कोरिया समुद्रातही माजवणार दहशत; पाण्याखाली केली 'ही' कामगिरी

    19-Jan-2024
Total Views |
 
north korea tested an underwater nuclear weapon system
(image source: internet/representative)  
 
नवी दिल्ली :
दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांच्यातील संयुक्त सागरी कवायतींना प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने शुक्रवारी पाण्याखाली आण्विक शस्त्रप्रणाली विकसित केली असून त्याची चाचणी केल्याचे सांगितले आहे. पूर्व समुद्रात 'Heil-५-२३' ची महत्वपूर्ण चाचणी पार पडली असल्याची माहिती उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
 
'पाण्याखालील आण्विक-आधारित प्रत्युत्तर कारवाईला अधिक प्रभावी बनवण्यात येत आहे. आमच्या सैन्याचा सागरी आणि पाण्याखालील बंडखोरी कारवाया युएस आणि त्याचा सहयोगी देशांच्या नौदलांप्रमाणे प्रतिकूल लष्करी युक्त्या रोखण्यासाठी सुरु ठेवतील,' असे उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
 
प्योंगयांगच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या हल्लीच झालेल्या प्रक्षेपणानंतर, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांनी संयुक्तपणे सोमवार आणि बुधवार दरम्यान अमेरिकी 'युएसएस कार्ल विंसस' या अणुशक्तीवर चालणाऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा समावेश करून नौदल सराव केला.
 
या आठवड्याच्या सुरुवातीला, दक्षिण कोरिया, युनायटेड स्टेट्स आणि जपानने दक्षिणी जेजू बेटावरील पाण्यात संयुक्त नौदल सराव केला. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने रविवारी केलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाला ही प्रत्युत्तर कारवाई आहे. या सरावात युएसएस कार्ल विन्सस या विमानवाहू जहाजासह तीन देशांच्या नऊ युद्धनौकांचा समावेश होता.