कच्च्या कांद्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

    18-Jan-2024
Total Views |

benefits of eating raw onion
(image source: internet/representative)
 
नागपूर :
कच्च्या कांद्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असून खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. कच्च्या कांद्यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे पोषक तत्व आढळतात. दैनंदिन आहारात याचा समावेश केल्याने आरोग्य संबंधित अनेक समस्या टाळता येतात.
 
भारतात पूर्वीपासूनच जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ला जातो. कांद्याला एक विशेष चव असते. इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वयंपाकात कांद्याचा उपयोग अधिक केला जातो. कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडातून वास येते म्हणून बरेच लोक कांदा खाण्याचे टाळतात. परंतु कांदा खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? कांद्याचे हे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही देखील दैनंदिन आहारात याचा समावेश नक्कीच कराल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाण असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत महत्वाची भूमिका निभावते. यामुळे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांपासून स्वतःला वाचवण्यात मदत होऊ शकते. तसेच कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात पांढऱ्या रक्तपेशी बनण्यात देखील मदत होते.
पचनशक्ती मजबूत होते
कच्च्या कांद्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते. हे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कच्चा कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते.
 
दृष्टी सुधारते
कच्च्या कांद्यात आढळणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या व्हिटॅमिन्सच्या मदतीने दृष्टी सुधारण्यात देखील मदत होऊ शकते.
स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त
सल्फर कंपाउंड्स मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भरपूर फायदेशीर असते. कच्च्या कांद्यात हे सल्फर कंपाउंड्स मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या मदतीने स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यात आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत मिळू शकते.
त्वचेसाठी फायदेशीर
कच्च्या कांद्यात क्वेर्सेटिन नावाचे अँटिऑक्सिडंट आढळते. तसेच व्हिटॅमिन सी देखील आढळते. या दोन्ही पोषक तत्वांच्या मदतीने त्वचेवरचा सुरकुत्या, पिंपल्स बरोबरच त्वचे संबंधित इतरही समस्या दूर करता येऊ शकतात.