मकर संक्रांतीला बनवा उत्तराखंडची 'ही' स्पेशल रेसिपी

    15-Jan-2024
Total Views |
 
makar sankranti special recipe
 (image source: internet/representative)
 
नागपूर :
विविधतेत एकता असणारा देश म्हणजे भारत. वेगवेगळ्या सणांच्या आणि सणासुदीला बनणाऱ्या पदार्थांची मेजवानी भारतात पाहायला मिळते. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा केला जातो. तसेच, या सणाला बनविले जाणारे पदार्थ देखील वेगवेगळे असतात. उत्तराखंडमध्ये मकर संक्रांत साजरा करताना घुघुती बनवली जाते. लहान मुलांना या घुघुती माळ देखील बनवून घातली जाते. जर, तुम्हालाही या संक्रांतीला काही वेगळे बनवायचे असेल तर तुम्ही देखील घुघुती बनवी शकता. चला तर जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने घुघुती कसे बनवता येईल.
 
साहित्य :
मैदा - २कप
तूप - ४ छोटे चमचे
बडीशेप - २ चमचे
तीळ - २ छोटे चमचा
रवा - २ चमचे
गूळ - १५० ग्राम
पाणी - गरजेनुसार
तेल - तळण्यासाठी
 
पद्धत :
घुघुती बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी उकळून त्यात गूळ टाका. गूळ विरघळल्यावर त्याचा पाक तयार होईल. आता एका बाऊलमध्ये मैदा घ्या. त्यामध्ये बडीशेप, तीळ, रवा, आणि तूप घालून चांगल्याने एकत्र करून घ्या. या मिश्रणात हळूहळू करत गुळाचा तयार पाक टाका. हलक्या हाताने या मिश्रण कणकेसारखे भिजवून घ्या. मात्र, हे करताना कणिक जास्त मऊ किंवा जास्त कडक होऊ नये याची काळजी घ्यावी. आता तयार कणकेचा छोटासा तुकडा तोडा. पोळपाटावर किंवा कुठल्याही सपाट पृष्ठभागावर ठेवून हाताच्या मदतीने या कणकेच्या गोळ्याला लांबीच्या दिशेने फिरवा. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला गोल चकलीसारखे देखील फिरवू शकता किंवा दोन्ही टोक जोडून साखळी सारखा आकार देऊ शकता. उर्वरित कणकेचे देखील अशाच प्रकारे आकार देऊन घुघुती तयार करून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घालून गरम होऊ द्या. गरम तेलात तयार घुघुती एक एक करून टाका. घुघुती तपकिरी होईपर्यंत तळून बाहेर काढून घ्या. तयार आहे उत्तराखंड स्पेशल घुघुती.