अमरावती :
गेल्या एका दशकापासून समाजातील वंचित,गरजु व अनाथ मुला- मुलींसाठी अविरत कार्य करणाऱ्या अमरावतीच्या सेवाव्रती गुंजन गोळे यांना यावर्षीचा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा तर्पण फाऊंडेशन द्वारा देण्यात येणारा 'तर्पण युवा पुरस्कार' जाहीर झाला असून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी पुणे येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आली.