मुंबई :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि फायनल नोव्हेंबर 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये मुंबईतील संस्कृती पारोलिया हिने दिशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
सीए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेत जयपूर येथील मधुर जैन याने सीए फायनल परीक्षेत 77.38 टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे, तर मुंबईतील संस्कृती पारोलिया 74.88 टक्के मिळवून सीए फायनलमध्ये देशात दुसरा आला आहे. तर जयपूरचा ऋषी मल्होत्रा ७३.७५ टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या सत्रात एकूण 8,650 उमेदवार सीए म्हणून पात्र ठरले आहेत.
तसेच जय देवांग जिमुलिया याने नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर 86.38 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवून मुंबई व राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तर अहमदाबाद आणि सुरत येथील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.