Heath Care Tips: 'या' काही टिप्स ने ठेवता येईल मेंदूला निरिगो

    01-Jan-2024
Total Views |
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
(image source:internet/representative) 
नागपूर :
स्वस्थ आरोग्य ठेवणे म्हणजे केवळ शरीराची काळजी घेणे आणि शरीराला निरोगी ठेवणेअसा बऱ्याच लोकांना गैरसमज असू शकतो. परंतु असे नाही आहे. निरोगी आणि स्वस्थ आरोग्यासाठी शरीराप्रमाणेच मेंदूला देखील स्वस्थ आणि निरोगी ठेवणे आवश्यक आहे. आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये मेंदू आणि मन शांत आणि स्वस्थ ठेवणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, मानसिक तणावासाठी वयाचे बंधन राहिले नाही आहे. सध्याच्या काळात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अशात 'या' काही टिप्स तुमचा मानसिक तणाव दूर करण्यासाठी मददगार ठरू शकते.
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
 (image source:internet/representative)
मेंदूला चालना देणारे खेळ खेळणे:
मानसिक तणाव दूर करण्यासाठी मेंदूचे खेळ खेळणे खूप फायदेशीर ठरते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे खेळ प्रत्येकासाठीच हे अगदी सोपे आणि उपयुक्त उपाय आहे. बुद्धिबळ, सुडोकू, क्विझ यांसारखे खेळ मेंदूचा व्यायाम करून मेंदूला सुदृश बनविण्यात मदत करतात.
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
 (image source:internet/representative)
सॉफ्ट गाणी ऐकणे:
गाणे हे मेंदू बरोबर मनासाठी देखील थेरपीचे काम करते. हलक्या आवाजात सॉफ्ट गाणी ऐकल्याने तणाव, डिप्रेशन दूर करण्यात मदत मिळते. गाणे मेंदूला शांत करून आंतरिक आनंद देतो. तणाव असल्यास आपल्या आवडीचे गाणी ऐकल्याने मनाला आनंद मिळतो आणि डिप्रेशन सारख्या गंबीर स्थितीतून देखील मेंदूला मुक्ती मिळू शकते.
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
  (image source:internet/representative)
पुस्तक वाचन करणे:
'वाचाल तर वाचाल' ही म्हण अगदी खरी आणि उपयुक्त आहे. वाचन मनाला स्थिर आणि तीक्ष्ण ठेवण्यात मदत करते. मेंदू आणि मन विचलित असता आपल्या आवडीचे पुस्तक वाचल्याने भरपूर फायदा होतो. वाचनामुळे शब्द संपदा आणि ज्ञान तर वाढतेच सोबतच, मानसिक तणावापासून सुटका देखील मिळण्यात मदत होते.
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
  (image source:internet/representative)
नियमितपणे ध्यान करणे:
मेंदूला स्थिर ठेवण्यासाठी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यान हे तणाव कमी करण्याचा आणि मनाला स्थिर ठेवण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. नियमितपणे ध्यान केल्याने मेंदूला चालना मिळते, आपले विचार समजून घेण्याची क्षमता वाढते आणि कुठल्याही समस्येला सामोरे जाण्याचा मार्ग मिळतो.
 
health-care-tips-maintain-mental-wellness-mendula-nirigo - Abhijeet Bharat
  (image source:internet/representative)
पुरेशी झोप घेणे:
स्वस्थ आणि निरोगी मेंदू आणि शरीरासाठी देखील पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर मानसिक थकवा जाणवतो आणि चिडचिड देखील होऊ शकते. पुरेशी झोप झाली नास्ता मन आणि मेंदू अस्थिर आणि विचलित राहू शकतात. पुरेशी झोप न घेण्याचा मेंदूवर वाईट परिणाम देखील होऊ शकतो.