NFDC-NFAI प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन अब्राहम यांच्या सन्मानार्थ त्यांचे ४ चित्रपट प्रदर्शित करणार

    06-Sep-2023
Total Views |
 
renowned-filmmaker-john-abraham-to-screen-his-4-films-at-nfdc-nfai-in-honorary-event - Abhijeet Bharat
 
पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘अम्मा अरियन’ (1986 | मल्याळम) हा चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक जॉन अब्राहम यांनी दिग्दर्शित केला होता. पुणे इथल्या एफटीआयआय, अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे ते विद्यार्थी होते. या संस्थेमधून त्यांनी पटकथा लेखन आणि चित्रपट दिग्दर्शनामधील सुवर्ण पदक जिंकून पदवी घेतली होती. एफटीआयआय मध्ये शिकत असताना त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कोयना नगर (1967), प्रिया (1967), आणि Hides and Strings (1969) या तीन लघुपटांसह ‘अम्मा अरियन’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
 
‘अम्मा अरियन’ हा लघुपट, एका तरुणाने त्याच्या आईला लिहिलेल्या मार्मिक पत्रांमधून मांडलेली जीवन, निराशा आणि जगण्याबाबतची त्याची निरीक्षणे आपल्यासमोर उलगडतो. 'कोयना नगर' हा लघुपट, 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना येथे झालेल्या भूकंपाच्या घटनेवर आधारित आहे. ‘हायड्स अँड स्ट्रिंग्स’ हा लघुपट पुण्यामधील वाद्य निर्मात्यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘प्रिया’ हा लघुपट प्रिया नावाच्या एका तरुणीच्या जीवनातील काही दिवसांचा प्रवास घडवतो.
 
मल्याळी भाषेतील हे चित्रपट इंग्रजी उप-लिपिसह (सबटायटल्स) प्रदर्शित केले जाणार असून, यासाठी प्रवेश विनामुल्य आहे. एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफडीसी-एनएफएआय) ने हाय डेफिनिशनमध्ये पुनर्संचयित केलेला अम्मा अरियन हा चित्रपट, आणि 35 मिमी प्रिंटवरील लघुपट, एनएफडीसी-एनएफएआय, लॉ कॉलेज रोड, पुणे इथल्या मुख्य चित्रपट गृहात शनिवार, 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून प्रदर्शित केले जातील. पुणेकर नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.