- सार्वजनिक शिवमंदीराचा स्तुत्य उपक्रम
वाडी : दत्तवाडी येथील न्यु मंगलधाम सोसायटीमधील सार्वजनिक शिवमंदीरात एक वर्षापासून प्रत्येक सोमवारी संध्याकाळी महाआरतीनंतर भव्य महाप्रसादाचे वितरण सुरू आहे. महाप्रसादाच्या आयोजनाची सुरुवात सर्वप्रथम सार्वजनिक शिवमंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कमल कनोजे यांनी सुरू केली. दर सोमवारी वेगवेगळे शिवभक्त महाप्रसाद वितरणासाठी हातभार लावत आहे.
श्रीकृपा गृपचे संचालक जितेंद्र रहांगडाले यांच्यातर्फे सोमवार ४ सप्टेंबर रोजी भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सर्वप्रथम गायत्री रहांगडाले व माजी ग्रा.पं. सदस्य सीमा कनोजे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी कमल कनोजे,जितेंद्र रहांगडाले, विक्रम तिजारे, ज्ञानेश्वर चोपडे,शेरसिंग पटले, अरुण कराळे, सुनील कुबडे,बापूसाहेब लिमकर, राजेंद्र बीसेन, अनील घागरे, देवा खाटीक, राकेश शिवणकर, गजेंद्र देवघरे, धिरज पिल्ले, सतीश नांदनकर, नरेंद्र नानोटकर, राजू विश्वकर्मा, अरुण सिंह, रमेश लोंढे, जतीन कनोजे, विजया तिजारे, सुषमा गौर, वृषाली नांदनकर, सुचिता घोडे, दयावती माटुरकर, मिनाक्षी चोपडे, रुपाली नांदनकर, अश्विनी ढोक, संगीता निंबर्ते, जया पहूरकर, अर्चना कोसे प्रामुख्याने उपस्थित होते.