अबब! काय ते वेड आणि काय ती आतुरता; शाहरुखच्या चाहत्यांकडून संपूर्ण थिएटर बुक

    04-Sep-2023
Total Views |

what is madness and what is eagerness the complete theater book by shahrukh fans - Abhijeet Bharat 
नागपूर : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसाठी त्यांच्या चाहत्यांचे वेड आपण पहिलेच आहे. वाढदिवस असो, चित्रपटाचे रिलीज असो किंवा अजून कुठला विशेष प्रसंग, शाहरुखचे नेहमीच त्याच्यासाठी काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असतात. अशातच नागपूरच्या 'The Club SRK' या फॅन क्लबने पुन्हा एकदा शाहरूख खानचे लक्ष वेधून घेत त्याच्या मनात आपली छाप सोडली आहे.
 
शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्री बुकिंग सुरु झाले असून नागपुरातील 'The Club SRK' ने 'जवान' पाहण्यासाठी एका खास अंदाजात संपूर्ण थिएटर बुक केले आहे. या फॅन क्लबने संपूर्णपणे चाहत्यांसाठी एक शो आयोजित केला आहे. त्यांच्या उपस्थितीने हा उत्सव अधिक मोठा करण्यासाठी त्यांना यात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
 
'The Club SRK' फॅन क्लबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मिशनसाठी सज्ज असलेल्या मुलींचा एक गट मल्टिप्लेक्समध्ये जवान स्टाइलने येतात. एका मुलीच्या हातात 'जवान'ची सुटकेचा दिसते. ही सुटकेस घेऊन त्या चित्रपटाचा सकाळी 9:45 च्या शोसाठी सर्व तिकिटे बुक करतात. चित्रपटाची तिकिटे मिळताच ते SRK गर्ल्सचा प्रसिद्ध 'रेडी चीफ' हा डायलॉग म्हणतात. तसेच व्हिडिओच्या शेवटी फॅन क्लब शाहरुख खानच्या चाहत्यांना या उत्साहात सहभागी होण्यासाठी सांगतात आणि मुली शाहरुख खानची आयकॉनिक पोज देतात.
 
 
'The Club SRK' ने हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जवानची तिकिटे बुक झाली आहेत. 'जवान'च्या महिला केंद्रित थीममध्ये संपूर्ण सभागृह बुक करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या मुली त्यांच्या चीफच्या आदेशाचे पालन करत आहेत. यासोबतच त्यांनी शाहरुख खान, रेड चिली एंटरटेनमेंट, करुणा बडवाल, पूजा ददलानी आणि बिलाल सिद्धीकी यांना टॅग केले असून आशा आहे की तुम्हाला हे आवडेल, असे लिहिले आहे. महत्वाची बाब म्हणजे शाहरुख खानने या व्हिडिओची दखल घेतली असून त्याने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या एक्स अकाउंटवर रिशेअर केला आहे.
  
 
'जवान' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे. शाहरुख खानसोबत या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर दुसरीकडे सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर हे देखील शोमध्ये दिसणार आहेत. यासोबतच दीपिका पदुकोणचाही या चित्रपटात कॅमिओ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली यांनी केले आहे.