गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरची आत्महत्या

    04-Sep-2023
Total Views |
  • वसतिगृहातील खोलीत लावला गळफास
suicide of a doctor in gondia government medical college - Abhijeet Bharat
 
गोंदिया : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भूषण वाढोळकर (24 वर्ष रा. चांदुररेल्वे जिल्हा अमरावती) असे मृतक डॉक्टराचे नाव आहे.
 
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली आहे. भूषण याने 2018 मध्ये गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणात प्रवेश केला होता, तर 2023 मध्ये त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 1 वर्षाकरिता तो इंटरशिप करत होता. महाविद्यालयाच्या वस्तीगृहातच तो सध्या राहत होता. दरम्यान रात्री उशिरा तो मित्रांशी गप्पा मारल्यानंतर आपल्या रूममध्ये गेला. मात्र सकाळी तो उशिरापर्यंत बाहेर न आल्याने तेथे राहणाऱ्या अन्य डॉक्टरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता भूषण हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला असून गोंदिया शहर पोलिश घटनेचा तपास घेत आहेत.