चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्रो) रविवारचा दिवस अत्यंत दुःखाचा ठरला. भारताची चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान-३ मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचे चेन्नईमध्ये रविवारी सायंकाळी निधन झाले. हृदयविकाराचा झाकता आल्याने त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
इस्रोच्या शास्त्रज्ञ एन वलारमथी यांनी चांद्रयान-३ चे काऊंटडाऊन केले होते. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी त्यांनीच उलटी गणती केली होती. तसेच एन वलारमथी या देशाचा पहिला स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह असलेल्या RISAT च्या प्रकल्प संचालक होत्या. तसेच त्या सतीश धवन स्पेस सेंटरमधील रेंज ऑपरेशन्स प्रोग्राम ऑफिसचा एक भाग होत्या, त्या सर्व प्रक्षेपणांवर काउंटडाउन घोषित करत असे. मात्र रविवारी सायंकाळी त्यांना चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका झल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. पीव्ही वेंकटकृष्ण यांनी वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, श्रीहरिकोट्टा येथून इस्रोच्या भविष्यात प्रक्षेपित होणाऱ्या मोहिमांच्या काउंटडाउनसाठी वलारमथी यांचा आवाज नसेल. चांद्रयान-३ ही त्यांची अंतिम काउंटडाउन घोषणा होती. एक अनपेक्षित निधन. ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले.'
२३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरलेले चांद्रयान-३ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. या ऐतिहासिक प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनमागे एन वलारमथी यांचा आवाज होता. चांद्रयान-३ हे त्यांच्या आयुष्याचे अंतिम काऊंटडाऊन होते. त्या तामिळनाडूतील अरियालुर येथील रहिवासी होत्या.