- 31 उमेदवारांची अंतिम निवड
Representative image
नागपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर व नॅशनल करीअर सर्विस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित एकदिवसीय रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एवेनस्टेन टेक्नोलॉजी या कंपनीमार्फत बिजनेस डेवलपमेंट इग्जेक्युटिव, सेल्स इग्जेक्युटिव, इलेक्ट्रिशियन, वेलडर आदी पदांसाठी एकूण 50 रिक्तपदांसाठी उद्योजकांमार्फत शैक्षिणक कागदपत्राची तपासणी करून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या.
मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील उमेदवारांनी उस्फूर्त प्रतिसाद देवून उपस्थिती नोंदविली. या (प्लेसमेंट ड्राइव) मध्ये एकूण 60 उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली. त्यापैकी 31 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात येऊन त्यांची दुस-या फेरीसाठी अंतिम निवड झाली. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली यंग प्रोफेशनल, नॅशनल करीअर सर्विस, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.