- सुराबर्डी सरपंचाचे तहसीलदाराला निवेदन
वाडी : सुराबर्डी तलावाचे पाणी सुराबर्डी, लाव्हा ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याकरीता वापरण्यात येत आहे. गणेश मुर्तीचे विसर्जन केल्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य होऊ शकते. तसेच सुराबर्डी येथील तलावाचे पाण्याबाबात मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे जनहित याचीका दाखल असून प्रकरण सुरू आहे. ग्रा.पं. सुराबर्डी परिसरातील गणेश मूर्तीचे विसर्जन तलावावर न करता अमरावती मार्गावरील शिवमंदिर बाजुच्या खदानवर करण्यात येते.
दरवर्षी वाडी व आजूबाजूच्या परिसरातील गणेश मुर्तीचे विसर्जन ग्रामपंचायत द्रुगधामना हद्दीतील डबलीन-८८ हॉटेल कडील भागात वाडी नगर परिषद मार्फत कृत्रीम टॅकची व्यवस्था व भरपुर विद्युत रोशनाईची व्यवस्था करण्यात येत असते. ग्रामपंचायत सुराबर्डी हद्दीत ग्रामपंचायत मार्फत मूर्ती विसर्जनाकरीता गावाकडील भागात कठडे लावण्यात येतात त्यामुळे या परिसरात मूर्ती विसर्जन करता येत नाही. संपूर्ण मूर्तीचे विसर्जन ग्रा.पं द्रुगधामना हद्दीतील डबलीन ८८ या मागनि होत असून याची व्यवस्था नगर परिषद वार्डी मार्फत करण्यात यावी.
ग्रामपंचायतकडे मनुष्यबळ फक्त दोन असून ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती बळकट नाही. अशा आशयाचे निवेदन सुराबर्डी ग्रामपंचायतचे सरपंच ईश्वर गणवीर व उपसरपंच मुकेश महाकाळकर यांच्यातर्फे नागपूर ग्रामीणचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार समीर मेघे, वाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, पंचायत समीती नागपूरचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.