सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! पंतप्रधानांच्या भाविकांना शुभेच्छा

    19-Sep-2023
Total Views |
 
ganesh-chaturthi-greetings-prime-minister-president - Abhijeet Bharat
 
नवी दिल्‍ली : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभरात आनंदमय आणि जल्लोषाचे वातावरण आहे. सर्व भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला वाजतगाजत घरी घेऊन येत आहेत. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले भाग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो, अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.
 
 
पंतप्रधान मोदींनी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'एक्स' वर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. 'देशभरातील माझ्या कुटुंबीयांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता विनायकाच्या पूजनाशी निगडित प्रत्येक उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात सौभाग्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो! गणपती बाप्पा मोरया!!' अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या.
 
 
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना राष्ट्रपती म्हणाल्या, 'गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! या शुभ दिवशी, भगवान श्री गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती आणि उत्साहात साजरा केला जातो. विघ्नहर्ता गणेश जी सर्व अडथळे दूर करत राहोत आणि विकसित राष्ट्राच्या उभारणीसाठी आपण सर्व मिळून काम करत राहो हीच माझी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया!'