पंचमुखी हनुमान मंदिरात १०१ किलो बुंदी लाडू वितरण व महाआरतीचे आयोजन

    12-Sep-2023
Total Views |
  • मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची मनमोहक आरास
Distribution of 101 kg of Bundi Ladu and organization of Maha Aarti in Panchmukhi Hanuman Temple - Abhjeet Bharat
 
नागपूर : शहरातील बाबुलखेडा बेल्लोरी येथील पंचमुखी हनुमान मंदिरात शनिवार ९ सप्टेंबर २०२३ रोजी विशेष पूजा आणि १०१ किलो बुंदी लाडू व महाप्रसाद वितरण तसेच महाआरतीचे आयोजन रोहित अतकरे (निवेदक) आणि मित्र परिवारातर्फे करण्यात आले.
 
यावेळी मंदिरात ८०० पेक्षा अधिक दिव्यांची आरास करण्यात आली होती. पहाटे ०४:४५ वाजता श्री हनुमान मूर्तीवर विधिवत मंगल अभिषेक करण्यात आला त्यानंतर संपन्न झालेल्या महाआरतीला १२०० पेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. तसेच यानंतर सर्व भाविक भक्तांनी १०१ किलो बुंदी लाडू वितरण आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
 
कार्यक्रमाचे आयोजन पंचमुखी हनुमान मंदिर आणि निवेदक रोहित अतकरे व मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले. 'करनेवाले हनुमानजी आणि करानेवाले भी हनुमानजी' अशी भावना या कार्यक्रमाप्रसंगी आयोजकांनी व्यक्त केली.