'आदित्य L1' च्या प्रक्षेपणापूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञांची मंदिरात पूजा

01 Sep 2023 17:43:07
 
Aditya L1 Mission

चेन्नई :
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) बहुप्रतिक्षित मिशन 'चांद्रयान-3' (Chandrayaan 3 Mission) ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. 'चांद्रयान-3' हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोने आपल्या पुढील अंतराळ मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. इस्रो देशाच्या पहिल्या सौर मोहिम 'आदित्य-L1' साठी (Aditya L1 Mission) सज्ज आहे. सूर्य मिशनचे प्रक्षेपण शनिवारी श्रीहरिकोटा येथून 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता होणार आहे. दरम्यान, भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो शास्त्रज्ञांनी भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि त्यांना आशीर्वाद मागितला.
 
इस्रोच्या शास्त्रज्ञांची एक टीम शुक्रवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला श्रीवेंकटेश्वर मंदिरात 'आदित्य-एल1' चे छोटे मॉडेल घेऊन पोहोचले. यावेळी त्यांनी पूजाअर्चना करत भगवान व्यंकटेश्वराला 'आदित्य L1' मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतले. 'आदित्य-L1' अंतराळयान हे इस्रोच्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेस पोर्टवरून प्रक्षेपित केले जाणार आहे. 
आदित्य L1 ही भारताचा पहिली सौर मोहीम आहे, जी PSLV-C57 द्वारे अवकाशात पाठवली जाईल. या मोहिमेसोबत सात पेलोड देखील पाठवले जाणार आहेत, जे सूर्याचा अभ्यास करतील. यापैकी चार पेलोड्स सूर्याकडून येणार्‍या प्रकाशाचा अभ्यास करतील, तर उर्वरित तीन सिटू पॅरामीटर्समध्ये यावरील प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करतील. आदित्य L1 वरील सर्वात महत्त्वाचा पेलोड दृश्य उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफ किंवा VELC आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने त्याची चाचणी आणि अंशांकन केले आहे. 
Powered By Sangraha 9.0