वाडी : येथील कंट्रोलवाडी मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय प्रणाली वर पती ललित डहाट याने वार करून खून केला. ललितने पत्नीच्या पोटावर आणि गळ्यावर चाकूने अनेक वार केल्याचा आरोप आहे.त्यामुळे तिला रक्तस्त्राव झाला आणि नंतर तिचा मृत्यू झाला.
आंबेडकर नगर मधील त्रिशरण चौकात पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून पतीने रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पत्नीचा भोसकून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पती ललित डहाट वय ३८ व मयत पत्नी प्रणाली डहाट वय ३२ हे दोघेही गेल्या ५ वर्षांपासून त्रिशरण चौकातील रतीराम सिताराम रामटेके यांच्या घरी भाड्याने राहत होते. आरोपी ललितचे पहिले लग्न राणी नावाच्या मुलीशी झाले होते. दोघे वेगवेगळे झाले होते.
त्यानंतर २०१५ पासून आरोपी ललित आणि मयत प्रणाली एकत्र राहत होते. आरोपी दिवसा चहाची टपरी सांभाळतो आणि संध्याकाळी शिकारा बार वाडी नाक्यावर बाऊन्सर म्हणून अर्धवेळ काम करतो. मृतक पत्नी प्रणाली ही कपड्याच्या दुकानात काम करत होती. आरोपी ललित डहाटच्या पहिल्या पत्नीने लग्न झाले.आरोपी ललितला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले पहील्या पत्नीकडून आहेत. दोन्ही मुले ललितच्या नातेवाईकाकडे राहतात. २०१५ पासून आरोपी ललित आपल्या दुसऱ्या पत्नी मृतक प्रणाली सोबत राहात आहे. पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या ६ महिन्यांपासून दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू होती. मृत प्रणाली तीन दिवसांसाठी वर्ध्याला गेली होती. रविवारी घटनेच्या दिवशी सकाळी ललित हा पत्नीला आणण्यासाठी रहाटे कॉलनीत गेला होता. ललितने मृत प्रणाली ला घरी आणले.
त्यांना घरी आणताच आरोपी पती ललित आणि मृत पत्नी प्रणाली यांच्यात वाद सुरू झाला. संतापलेल्या ललितने प्रणालीच्या पोटावर, मानेवर आणि तोंडावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली, त्यामुळे प्रणालीला रक्तस्त्राव झाला आणि नंतर तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी ललितने सूरज नावाच्या कार्यकर्ताला खुन केल्याची माहिती दिली. सूरजने तत्काळ वाडी पोलिसांना माहिती दिली; वाडी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले; घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना वाडी पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे, हेड कॉन्सटेबल प्रमोद गिरी, प्रवीण फलके, प्रमोद सोनोने यांनी आरोपी ललितला ताब्यात घेतले.अतिरिक्त उपायुक्त चेतना तिडके, एसीपी प्रवीण तेजाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, एपीआय अचल कपूर, पीएसआय विजय नाचन, मनोज तिवारी, श्रीकांत कनोज घटनास्थळाची पाहणी केली.