- चित्रकला स्पर्धेत लकेश पारधी प्रथम नगर परिषद वाडीचे आयोजन
वाडी : नगर परिषद वाडीतर्फे घेण्यात आलेल्या 'माझी माती, माझा देश' विषयांतर्गत निबंध स्पर्धेत स्व. प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी आदिती धकाते हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर चित्रकला स्पर्धेत लकेश पारधी याचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक भाविका तडस हिने पटकाविला असून विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र वाडी नगर परिषदेतर्फे देण्यात आले.
इतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन बक्षीस म्हणून देण्यात आले. या स्पर्धेत या शाळेतील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण शनिवार २६ ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात संस्थेच्या संचालिका मीनाक्षी घोडखांदे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका अर्चना डायगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिक्षक अनिल ठाकरे, अशोक घरडे, योगेश्वर दांडेकर, अजय खाडे, राकेश पंत, गणेश श्रीखंडे, आलोक खोकले, मंजुषा भोसे, दिनेश खाडे, सविता गोहत्रे, सीमा गायकवाड, कल्पना उईके, सुलोचना घुटे, अश्विनी राठोड, मीना मुसळे, यशस्वी कराळे राजेश थोराने, रुपेश वानखेडे, सुधीर बेलखोडे, यशस्वी कराळे उपस्थित होते.