सद्गुरुदास महाराजांच्या तीन ग्रंथांचे 17 रोजी प्रकाशन

13 Aug 2023 15:37:48
 
publication of three books of sadgurudas maharaj on 17 - Abhijeet Bharat
 
नागपूर : छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख लिखित शककर्ते शिवराय खंड १ व २, तसेच राजा शंभूछत्रपती आणि सूर्यपुत्र या गाजलेल्या तीन मराठी ग्रंथांच्या नव्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शिवराज्याभिषेकांच्या ३५० व्या वर्षानिमित्त करण्याचे ठरविले आहे. हा प्रकाशन समारंभ गुरुवार, १७ ऑगस्ट रोजीसायंकाळी ६ वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला आहे.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहतील. यासोबतच लेखक धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, भाजपा नेते सुनील देवधर, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित विशेषत्वाने उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला शिवप्रेमी, साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0