अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल यांनी स्वीकारला पदभार

31 Jul 2023 17:22:08

anchal sood goyal
 
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आंचल सूद गोयल (भा.प्र.से) यांनी सोमवारी ३१ जुलै राजी पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गोयल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रभारी/अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त रवींद्र भेलावे, सुरेश बगळे उपस्थित होते.
 
आंचल सूद गोयल या २०१४ बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी चंडीगढ येथून प्राप्त केली. नागपूरमध्ये येण्यापूर्वी त्या परभणी येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम, नॅचरल गॅस विभाग सहाय्यक सचिव पदावर काम केले आहे. त्या पालघर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. रत्नागिरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य चित्रपट, सांस्कृतिक विकास विभाग महामंडळ येथे सहाय्यक निदेशक पदावर सुद्धा त्यांनी काम केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0