जयंत दुबळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरले नागपूरचे नाव; इंग्लिश खाडी टू वे पोहून केला आशियाई साहसी जलतरणात विक्रम

30 Jul 2023 15:14:59

Asian adventure swimming record by swimming English Gulf two way - Abhijeet Bharat
 
नागपूर : नागपूरच्या जयंत दुबळे व त्याच्या टीमने नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.18 व 19 जुलै 2023 दरम्यान इंग्लंडची जगप्रसिद्ध असलेली इंग्लिश खाडी - इंग्लंड ते फ्रान्स व फ्रान्स ते इंग्लंड असे टू वे 70 किलोमीटरचे अंतर तब्बल 31 तास 29 मिनिटांमध्ये जयंत व त्याच्या टीमने पोहून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणामध्ये अंकित केले आहे.
 
जयंत जयप्रकाश दुबळेचे आज रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर प्राचार्य डॉ. विजय दातारकर, डॉ. संभाजी भोसले, प्रा. शाम फाळके, मंगेश डुके, निखिलेश सावरकर, डॉ. सुरेश चांडक, ॲड. अर्चना मेंडुले, क्रीडा अधिकारी माया दुबळे, ॲड. भूमीता सावरकर, संजीव गरजे, विलास शिंदे, राहुल सलामे, सुभाष लांडे, रामेश्वर लिखार, सुशील दूरगकर, ऐश्वर्या दुबळे, प्राजक्ता दुबळे, आशिष आढाव व शेकडो जलतरणपटू, खेळाडू , क्रीडा संघटक यांन रेल्वे स्टेशनवर ढोल ताशा सह जयंत व भारतीय संघाचे स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांचे भव्य स्वागत केले.
 
Asian adventure swimming record by swimming English Gulf two way - Abhijeet Bharat 
जयंताने या विक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून इंग्लिश खाडी पोहण्याची तयारी सुरू होती. आज ही इंग्लिश खाडी पोहून मला अतिशय आनंद होत आहे. नागपूरमधूनही असे सागरी जलतरणपटू तयार व्हावेत, त्याकरिता मी प्रयत्नशील राहणार आहे.
 
यावेळी आंतरराष्ट्रीय स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, मोहता स्पोर्ट्स अकॅडमी, भोसले व्यायाम शाळा, डॉल्फिन स्विमिंग क्लब जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0