- विदर्भाच्या प्रवेशद्वारावर जल्लोषात स्वागत
बुलढाणा : शेगाव चे योगिराज संत श्री गजानन महाराज यांच्या पालकी एकादशीच्या उत्सवात पंढरपूरमध्ये सहभाग घेतल्यानंतर आज विदर्भ मध्ये आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत म्हणजे सिंदखेराजा येथे जालण्यातून आज 2 वाजून वीस मिनिटांनी आगमन झाले .पंढरपूर ला आषाढी साठी हि पालखी शेगाव येथून रवाना झाली होती .आता पंढरपूर येथील आषाढी एकादशी चां उत्सव उरकून गजानन महाराज यांची पालकी शेगाव कडे रवाना झाली आहे .शेकडो वारकरी भजन दिंड्या घोडे वाहने यांच्या सह वाजत गाजत भजन म्हणत आता महाराज यांची पालखी परत आली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर फटाके फोडून पालखी चे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. ही पालकी सिंदखेराजा येथे आज मुक्काम करेल .आणि मग ही शेगाव कडे प्रस्थान करणार आहे.24 जुलै रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ही पालखी संतनगरी शेगाव मध्ये दाखल होणार आहे.