'झॉलीवूड' च्या यशानंतर आता तृशांत इंगळेंचा 'उलगुलान'

09 Jun 2023 14:59:38
  • सोशल मीडियावर आगामी चित्रपटाची घोषणा
ulgulan - Abhijeet Bharat
 
नागपूर : 'झॉलीवूड' या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणारे अभिनेता तृषांत इंगळे पुन्हा एकदा एका नव्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झॉलीवूड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर तृषांत यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर 'उलगुलान' या त्यांच्या दुसऱ्या दिग्दर्शनाच्या चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे.
 
 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तृषांत इंगळे यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी मराठी चित्रपट 'उलगुलान'चे शीर्षक पोस्टर शेअर केले आहे. तृषांत यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाच्या शीर्षकाचे पोस्टर पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शीर्षक जाहीर करताना आनंद होत आहे..!!! "ULGULAN " ( खऱ्या खोट्याची खरी कहाणी) "उलगुलान" च्या नावानं चांगभलं... २०२४ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित जाणार.'
 
 
आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना तृषांत इंगळे म्हणाले, ‘उलगुलान’ म्हणजे क्रांती आणि हा चित्रपट भारतातील आदिवासी समाजावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. नागपूर विदर्भातील कलाकारही यात नक्की बघायला मिळतील. चित्रपटाचे स्क्रिप्ट लेखन पूर्ण झाले आहे आणि तो ऑगस्टमध्ये निर्मितीसाठी तयार होईल. तसेच 'उलगुलान' हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0