'आदिपुरुष'च्या रिलीजपूर्वी करिती सॅनन आणि ओम राऊत यांची तिरुपती मंदिराला भेट

    07-Jun-2023
Total Views |

Kirti Sanon - Abhijeet bharat
 
नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रातील सध्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित असलेला प्रभास स्टारर 'आदिपुरुष' हा पौराणिक चित्रपट 16 जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवसेंदिवस चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढतच चालली असून 'आदिपुरुष' त्याच्या भव्य प्रीमियरपासून 10 दिवस दूर आहे. अशातच तिरुपती येथे 6 जून रोजी चित्रपटाचा प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपूर्ण कलाकार एकत्र आले. कार्यक्रमानंतर, दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांनी बुधवारी सकाळची तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, 'कृती सेनन आणि ओम राऊत यांनी 7 जून रोजी सकाळी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि क्रितीने गाडीतून निघताना निरोप घेतला.'
 
 
यानंतर दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, 'मंदिरात आल्यानंतर मला खूप विस्मयकारक वाटते. छान वाटले. आज सकाळी आम्ही खूप छान दर्शन घेतले. काल आम्ही ट्रेलर प्रदर्शित केला. ही एक मंत्रमुग्ध करणारी भावना आहे आणि मी ते शब्दात मांडू शकत नाही.'
 
ओम राऊत लिखित आणि दिग्दर्शित आदिपुरुष हा वाल्मिकींच्या रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात सुपरस्टार प्रभास राघवाच्या भूमिकेत आहे, तर सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन अनुक्रमे लंकेश आणि जानकीच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी सिंग, देवदत्त नागे, वत्सल शेठ, सोनल चौहान आणि तृप्ती तोरडमल यांची देखील चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. याशिवाय ती-सिरीज फिल्म्स आणि रेट्रोफिल्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे छायाचित्रण कार्तिक पलानी यांनी केले आहे आणि संपादन अपूर्वा मोतीवाले सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी केले आहे.