Chhattisgarh : विजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक

    07-Jun-2023
Total Views |

Chhattisgarh Naxal - Abhijeet Barat
 
रायपूर : छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील जंगलात बुधवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु झाली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जंगल युद्ध युनिट CoBRA आणि मध्य प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने नक्षलवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे.
 
 
पोलिस महानिरीक्षक बस्तर पी सुंदरराज यांनी विजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीबाबत माहिती देताना सांगितले की, विजापूर जिल्ह्यातील बासागुडा-पामेड-उसोर ट्राय जंक्शन भागात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. सुरक्षा दले ठीक आहेत. तसेच नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले हे शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. शोध मोहीम अद्याप सुरू असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर अधिक तपशील उघड केला जाईल.