नागपुरात 9 जून रोजी 'स्वरजल्लोष'; गायक अवधूत गुप्ते यांची विशेष उपस्थिती

    06-Jun-2023
Total Views |

avadhoot gupte - Abhijeet Bharat
 
नागपूर : स्वरतरंग संगीत विद्यालयाच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त 'स्वरजल्लोष' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या 9 जून 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल. स्वरतरंग संगीत विद्यालय प्रस्तुत या कर्यक्रमाला प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
 
स्वरतरंग संगीत विद्यालयाने मागील 15 वर्षात अनेक विद्यार्थी घडवले असून यातील सर्व यशस्वी कलाकार या कार्यक्रमात गायन करणार आहेत. अवधूत गुप्ते व निरंजन बोबडे यांचे विशेष सादरीकरण देखील श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन निरंजन बोबडे यांचे आहे.
 
कार्यक्रमाच्या नि:शुल्क प्रवेश पत्रिका लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात 8 जून रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत उपलब्ध राहतील. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, जॉन्सन लिफ्ट आणि एस्केलेटर, सेरेंडिपिटी लेक्स आणि रिसॉर्ट्स- तामिया, आणि प्रगल्भ सेवा संस्था यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.