प्राईम व्हिडिओने केली 'जी कारदा'च्या जागतिक प्रीमियरची घोषणा

    05-Jun-2023
Total Views |

Jee karda - Abhijeet Bharat
 
मुंबई : प्राईम व्हिडिओ म्हणजे भारतातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्वात पसंतीचे ठिकाण. प्राईम व्हिडिओने आता आपली आगामी ॲमेझॉम ओरिजिनल अत्याधुनिक रोमान्स ड्रामा सिरीज 'जी करदा' च्या 15 जूनपासून जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. या सिरीजची कथा बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते ज्यांना हे जाणवते की वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचे आयुष्य त्यांच्या बालपणात कल्पना केल्याप्रमाणे नाही.
 
'जी कारदा' ही सिरीज दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे निर्मित असून अरुणिमा शर्मा यांनी याचे लिखाण आणि दिग्दर्शन केले आहे. हुसैन दलाल आणि अब्बास दलाल यांनी या मालिकेचे सह-लेखन केले आहे. तसेच तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसेन दलाल, सायन बॅनर्जी, संदेश सुवाल्का, सिमोन सिंग आणि मल्हार यांच्या 'जी कारदा' सिरीजमध्ये मुख्य भूमिका असणार आहेत.
 
या सर्व 8 एपिसोड्सच्या स्ट्रीमिंगचा आनंद भारतातील तसेच जगभरातील 240 देश आणि प्रदेशातील प्राईम सदस्य घेऊ शकतात. 'जी कारदा' ही प्राईम मेंबरशिपमध्ये जोडली जाणारी नवीनतम सिरीज आहे.