तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांचे 6 जून रोजी व्याख्यान

    05-Jun-2023
Total Views |
  • हिंदू साम्राज्‍य दिनानिमित्त आयोजन
Shirish More - Shivaji Maharaj - Abhijeet Bharat 
नागपूर : श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्‍थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शके 350 प्रारंभ निमित्त शिवराज्याभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिन उत्सवात साजरा करण्यात येत आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवार, 6 जून 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या उत्सवात संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे व्‍याख्‍यान होईल.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री देवनाथ मठ, श्री क्षेत्र सुजी-अंजनी ग्रामचे श्रीनाथ पीठाधीश्वर प. पू. आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज राहणार आहेत. श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवराज्‍याभिषेक सोहळा समितीच्यावतीने करण्‍यात आले आहे.