नागपुरात नविनिकरण ऊर्जा निर्मितीसाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ; प्रकल्पांतर्गत 10 हजार लोकांना रोजगार

    24-Jun-2023
Total Views |

dvendra Fadnavis - Abhijeet Bharat
नागपूर : राज्य सरकारने दिल्ली येथील रिन्यू पॉवर लिमिटेडशी सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी नागपुरात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारचा उद्योग विभाग आणि नूतनीकरण वीज कंपनी यांच्यात मुंबईत करार झाला असून या प्रकल्पांतर्गत 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. हा करार रिन्यू पॉवर या अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीसोबत करण्यात आला आहे.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कराराप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर उपस्थित होते.
 
रिन्यू पवार लिमिटेड कंपनी 10 GW मेटलर्जिकल ग्रेड सिलिका, 10 GW पॉलिसिलिकॉन, 6 GW मॉड्युल निर्मितीचा प्रकल्प नागपुरात प्रस्तावित करणार असून या प्रकल्पातून 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला जात आहे.उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सुमारे 500 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
 
उमरेडमध्ये हा प्रकल्प उभा राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रस्तावित प्रकल्पात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पातून सुमारे 8,000 ते 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित पूरक उद्योगांच्या माध्यमातून 2000 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक अपेक्षित आहे.