'वसुधैम कुटुंबकम करिता योग' संकल्पनेने नागपुरात जागतिक योग दिन साजरा
21 Jun 2023 12:14:01
नागपूर :
जागतिक योग दिनाच्या (World Yoga Day) अनुषंगाने यावर्षी संपूर्ण देशभरात ‘वसुधैम कुटुंबकम करिता योग’ या संकल्पनेसह ‘हर घर - आंगण योग’ ही थीम राबविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकरांनी आज सकाळी धंतोलीतील यशवंत स्टेडियम येथे आज सकाळी सामूहिक योगासन केले. नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ देखील सहभागी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी भुषवले. याच सामूहिक योगासन कार्यक्रमाची झलक आपण येथे पाहणार आहोत.