रेडिओ ऑरेंज, एएम सिनेमाचा अभिनव उपक्रम 'माझा मराठी सिनेमा'

    10-Jun-2023
Total Views |
- 'TDM' चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग

Team TDM 
 
नागपूर :
राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांचा 'टीडीएम' हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आता नागपुरात याच्या स्पेशल स्क्रीनिंगचे (Special Screening Film TDM) आयोजन करण्यात आले. रेडिओ ऑरेंज आणि एएम सिनेमा (AM Cinema) यांच्या पुढाकाराने 'माझा मराठी सिनेमा' अंतर्गत शुक्रवारी 'टीडीएम'च्या स्टार कास्टसह ही स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आली. यानंतर ज्यानंतर लोकांनी चित्रपट, त्याची कथा आणि अभिनयाचे कौतुक केले.
 
नागपुरातील मनीष नगर स्थित एएम सिनेमा येथे शुक्रवारी ९ जून २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता 'टीडीएम' चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आली. मराठी चित्रपट असल्याने तसेच यात नवीन कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाला मोठा पडदा मिळू शकला नसल्याचे चित्रपटातील कलाकारांचे म्हणणे आहे. त्याचवेळी चित्रपटाचे काम जितके महत्त्वाचे असते, तितकेच चित्रपटाचे प्रमोशन कसे केले जाते, हेही महत्त्वाचे असल्याचे चित्रपट तज्ञांचे म्हणणे आहे. मराठी चित्रपट आणि मराठी भाषेला पाठिंबा देण्यासाठी रेडिओ ऑरेंजने महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशनवर #माझा मराठी सिनेमा ची मोहीम प्रसारित केली आणि मराठी चित्रपटांबद्दल लोकांना जागरूक केले.
 
या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या तेव्हा सर्वजण खूप उत्सुक दिसले. एकाने सांगितले की, चित्रपटात गावातील संस्कृतीचे दर्शन घडते. तर काहीजण म्हणाले, 'या चित्रपटात वापरलेली मराठी इतकी वेगळी आहे की फार कमी लोक अशी मराठी ऐकतात किंवा बोलतात.
 
Special Screening of Marathi Film TDM 
चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान, 'टीडीएम' चित्रपटातील स्टार कास्टसह रेडिओ ऑरेंजचे नॅशनल क्रिएटिव्ह हेड मिलिंद पाटील आणि नॅशनल बिजनेस हेड अजय मोकडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच आरजे आरव आणि आरजे भावना यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले असून आरजे ऐश्वर्या, आरजे नेहा, आरजे अजिंक्य, आरजे ॲनी हे देखील उपस्थित होते. मराठी चित्रपटांनी जास्तीतजास्त प्रमोशन करून लोकांपर्यंत पोहोचावे आणि प्रेक्षकांनी देखील मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद द्यावा, असे यावेळी अजय मोकडे म्हणाले. तसेच मिलिंद पाटील यांनीही चित्रपट आणि मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
 
अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्तने यांनी 'टीडीएम' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. भुमेश रिअलेटर्सकडून या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले असून हॉटेल अशोकाचे याला सहकार्य लाभले. याशिवाय अभिजीत भारत चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचा डिजिटल पार्टनर आहे. यावेळी कालिंदी निस्तने आणि पृथ्वीराज थोरात यांनी 'माझा मराठी सिनेमा' अंतर्गत आयोजित केलेल्या या विशेष स्क्रीनिंगबद्दल एएम सिनेमा आणि रेडिओ ऑरेंजचे आभार मानले आहेत.