देवर्षि नारद जयंती पत्रकार सन्मान पुरस्कारांचे वितरण १३ जून रोजी

    10-Jun-2023
Total Views |
  • संजय रामगिरीवार, रजत वशिष्ठ, विशाल महाकाळकर, डॉ . लखेश्वर चंद्रवंश व निखिल चंदवानी यांची निवड
Distribution of Devarshi Narad Jayanti Journalist Honor Awards - Abhijeet Bharat 
नागपूर : विश्व संवाद केंद्राच्या वतीने (पूर्व विदर्भ विभाग) देण्यात येणाऱ्या देवर्षि नारद सन्मान पुरस्कार -२०२३ ची घोषणा पत्रकार परिषदेत शनिवारी करण्यात आली आहे. मंगळवार १३ जून २०२३ रोजी दुपारी 2 वाजता सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे देवर्षि नारद जयंती पत्रकार सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
देवर्षि नारद जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर हे उपस्थित राहणार आहेत. तर मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रीय पातळीच्या पत्रकार व वृत्तनिवेदीका रुबिका लियाकत यांची उपस्थिती असेल. यंदा पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. आद्य पत्रकार देवर्षि नारद यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृत्तपत्र, दुरचित्रवाणी माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार व कॅमेरापर्सन्सचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यंदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सिटीझन जर्नलिस्टचा देखील गौरव करण्यात येणार आहे.
 
पुरस्कार विजेते
 
यंदा १. मुद्रित माध्यमांच्या (प्रिंट मीडिया) गटातून संजय रामगिरीवार (दै. तरुण भारत, चंद्रपूर) २. दृकश्राव्य माध्यमांच्या (इलेक्ट्रॉनिक मीडिया) - रजत वशिष्ठ (एबीपी माझा, नागपूर) ३. छायाचित्रकार गटातून - विशाल महाकाळकर (लोकमत, नागपूर) ४. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स गटातून - निखिल चंदवानी, नागपूर ५. सिटीझन जर्नलिस्ट गटातून 'डॉ . लखेश्वर चंद्रवंशी (नागपूर) यांना देवर्षि नारद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
निवड समिती
 
पुरस्कार निवड समितीमध्ये विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक, प्रसिद्ध उद्योजक विलास काळे, ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, विश्व संवाद केंद्र प्रमुख अतुल पिंगळे, वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे, वरिष्ठ पत्रकार अमर काणे व जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ मंजुषा जोशी यांचा प्रामुख्याने समावेश होता. पत्रकार परिषदेत विश्व संवाद केंद्र अध्यक्ष अतुल पिंगळे व नागपूर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस यांची उपस्थिती होती.