रायपूर : १०वी-१२वी बोर्ड परीक्षेतील टॉपर्सनी भरले यशाचे उड्डाण

    10-Jun-2023
Total Views |
  • छत्तीसगड बोर्ड परीक्षेतील टॉपर्ससाठी हेलीकॉप्टर राईडचे आयोजन
Helicopter Ride - Abhijeet Bharat
 
रायपूर : छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचा काही दिवसांपूर्वीच निकाल लागला. या परीक्षेत टॉप केलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने विशेष हेलिकॉप्टर राईडची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी राज्यातील 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेतील टॉपर्सनी रायपूर येथील पोलिस मैदानावरून आपल्या यशाचे उड्डाण भरले. या हेलिकॉप्टर जॉयराईडअंतर्गत आज 88 विद्यार्थ्यांनी आकाशातून रायपूरची सैर केली.
 
 
रायपूर हेलिपॅडवर यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी सकाळी विद्यार्थी त्यांच्या पालकांसह हेलिपॅडवर पोहोचले. यानंतर सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मुलांना हेलिकॉप्टरने रायपूर शहराचा प्रवास करवण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. छत्तीसगडचे शालेय शिक्षण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विकास मंत्री डॉ. प्रेमसाई सिंह टेकम यांनी सांगितले की, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मुले पहिल्या 10 मध्ये आल्यास त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही आज पूर्ण झाले आहे.
 
 
छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2023 च्या दहावी आणि बारावीच्या वार्षिक बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता यादीत 88 मुलांनी स्थान मिळविले आहे. आज हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर सर्व विद्यार्थी खूप आनंदी दिसत होते. सर्व टॉपर्सना हेलिकॉप्टर जॉयराईडवर नेण्यासाठी हेलिकॉप्टरने 15 वेळा उड्डाण केले.