छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला; 50 किलो IED जप्त

24 May 2023 19:57:03

50 kg ied seized in chhattisgarh
 (Image Source : Internet)
 
विजापूर :
छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती. मात्र, सुरक्षा दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला अयशस्वी (security forces foiled major naxalite attack) केला आहे. सुरक्षा दल आणि पोलिस दलाने छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातून नक्षलवाद्यांनी जमिनीच्या खाली दबलेला ५० किलो IED जप्त केला आहे. रस्त्याच्या खाली पाच फूट फॉक्स होल बनवून हे IED दाबण्यात आले होते. हा स्फोट झाला असता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली असती. महत्वाचे म्हणजे सुमारे महिनाभरापूर्वी २६ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी दंतेवाडातील अरणपूर येथे असाच स्फोट घडवून आणला होता. त्यात ५० किलो आयईडीचाही वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात १० जवान शहीद झाले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ 168 आणि 222 व्या बटालियनचे जवान बुधवारी ठाणे अवपल्ली येथून शोधासाठी गेले होते. यावेळी अवापल्ली-बासागुडा मार्गावरील दुर्गा मंदिराजवळ जवानांनी आयईडी जप्त केला. नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या मधोमध आठ फूट लांबीचा आणि पाच फूट खोलीचा फॉक्स होल पाडला होता. यामध्ये २५-२५ किलो वजनाचे आयईडी स्फोटके दोन प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सीरिजमध्ये दाबून ठेवण्यात आले होते. झडतीदरम्यान जवानांनी तो जागीच पकडला आणि बीडीएसच्या पथकाने तो निष्प्रभ केला.
 
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरही स्फोटके जप्त
एक दिवस आधी मंगळवारी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर जवानांनी १० नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके बड्या माओवादी नेत्यांकडे नेली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हे स्फोटक छत्तीसगड किंवा तेलंगणातील हल्ल्यासाठी वापरले जाणार होते, असेही समोर आले आहे. या वर्षातील सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्याची ही तयारी मानली जात होती. पकडलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच विजापूरचे रहिवासी आहेत.
 
Powered By Sangraha 9.0