देशातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ; एकूण रुग्णसंख्या ३१ हजारांवर

08 Apr 2023 16:31:51

Covid - Abhijeet Bharat 
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. योग्य काळजी घेतल्यास फारसे घाबरण्याचे कारण नसले तरी देशातील नागरिकांसह आरोग्य यंत्रणेसाठी ही चिंताजनक बाब आहे. गेल्या २४ तासात देशात ६,१५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३१,१९४ झाली आहे. यासोबतच कोरोनाचा दैनंदिन सकारात्मकता दर ५.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक सकारात्मकता दर ३.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटी ४७ लाख ५१ हजार २५९ वर पोहोचली आहे. तसेच आदल्या दिवशी झालेल्या ११ मृत्यूंसह देशातील एकूण मृतांची संख्या ५ लाख ३० हजार ९५४ वर पोहोचली आहे.
 
दरम्यान, कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४१ लाख ८९ हजार १११ वर पोहोचली आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबरोबरच महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळमध्येही मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.
Powered By Sangraha 9.0