ट्रायची सेवा गुणवत्ता नियमनाचे पुनरावलोकन सादर करण्यासाठी मुदतवाढ

    06-Apr-2023
Total Views |
 
TRAI - Abhijeet Bharat
 
नवी दिल्‍ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 24 फेब्रुवारी 2023 रोजी सेवा गुणवत्ता (मीटरिंग आणि बिलिंग अचूकतेसाठी सराव संहिता) विनियम, 2023 च्या पुनरावलोकनावर मसुदा नियमन आणि या नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला होता. भागधारकांद्वारे आपले अभिप्राय सादर करण्याची मुदत 7 एप्रिल 2023 पर्यंत होती.
 
अभिप्राय सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यासाठी भागधारक आणि उद्योग संघटनांनी केलेल्या विनंतीनुसार मसुदा विनियम आणि या नियमनाच्या मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर टिप्पण्या सादर करण्याची अंतिम तारीख 3 आठवडे म्हणजे 1 मे
2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
भागधारक आपले अभिप्राय शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ट्रायच्या सेवेची गुणवत्ता विभागाचे सल्लागार तेजपाल सिंग यांना [email protected]. या पत्त्यावर ईमेलद्वारे पाठवू शकतात. इतर कोणत्याही स्पष्टीकरणासाठी तेजपाल सिंग यांच्याशी ईमेलद्वारे [email protected] या पत्त्यावर किंवा +91-11-2323-3602 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो.