ANI Locked : असे काय झाले की एलन मस्कने केले ANI वृत्तसंस्थेचे अकाउंट लॉक

    29-Apr-2023
Total Views |

Twitter locked ANI Account
 
नवी दिल्ली : 
लाखो फॉलोअर्स असणाऱ्या एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) चे अकाउंट अचानकच ट्विटरदिसेनासे झाले आहे. त्यामुळे ANI च्या अनेक युजर्सला धक्का बसला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यासाठी किमान वयाच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे ट्विटरने एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) चे खाते लॉक केले आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर ‘हे खाते अस्तित्वात नाही’ असा संदेश दिसत आहे.
स्मिता प्रकाश यांनी ट्विटरवरून पाठवलेल्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला असून एएनआयचे हँडल लॉक झाले आहे, अशी माहिती दिली आहे. या मेलमध्ये असे लिहिले आहे की, 'ट्विटर खाते तयार करण्यासाठी तुमचे वय किमान 13 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही या वयाच्या अटी पूर्ण करत नाही, त्यामुळे तुमचे खाते लॉक केले गेले आहे आणि Twitter वरून काढून टाकले जाईल, असे Twitter ने निर्धारित केले आहे.'

Smita Prakash Tweet 
ANI चे ट्विटर अकाउंट अचानक गायब झाल्यानंतर काही मिनिटांनी, स्मिता प्रकाश यांनी ट्विट केले, 'ANI फॉलो करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. Twitter ने 7.6 दशलक्ष फॉलोअर्स असलेली भारतातील सर्वात मोठी न्यूज एजन्सी ANI लॉक केली आहे आणि - 13 वर्षाखालील असल्याचा मेल पाठवला आहे. आमचा गोल्डन टिक काढून घेण्यात आला, त्याच्या जागी निळ्या रंगाची टिक लावली गेली आणि आता अकाउंट लॉक करण्यात आले.