न्यूजीलँडमध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के; ६.९ होती तीव्रता

    04-Mar-2023
Total Views |

Earthquake
(Image Source : Internet/ Representative)
 
वेलिंग्टन :
जगभरात सध्या सुरु असलेले भूकंपाचे (earthquake) सत्र संपता संपत नाही आहे. दररोज भूकंपाच्या बातम्या समोर येतात. शनिवारी न्यूजीलँडमध्ये भूकंप झाल्याचे वृत्त समोर आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवण्यात आल्याचे माहिती आहे. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाली की नाही, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
 
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी न्यूझीलंडमधील केरमाडेक बेटांवर 6.9 तीव्रतेचा भूकंप (earthquake) झाला. हा भूकंप १५२ किमी (९४ मैल) खोलीवर होता. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने यापूर्वी या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी आणि 183 किमी खोली असल्याचा अंदाज वर्तवला होता.
न्यूझीलंडमधील केरमाडेक बेटांवर शनिवारी झालेल्या भूकंपानंतर (earthquake) त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, असे यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने म्हटले आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.