वि. सा. संघात कवी ग्रेस स्मृतिदिन कार्यक्रम

    26-Mar-2023
Total Views |

Poet Grace Memorial Day Program
 
नागपूर :
कवी ग्रेस (Poet Grace) यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी २७ मार्च रोजी कवी ग्रेस यांच्यावरील ललितबंधांवर आधारित नाट्य अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. झाशी राणी चौक येथील विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
 
'जागर' निर्मित 'कवी जातो तेव्हा...' या डॉ. समीर वसंत कुलकर्णी लिखित आणि अमित वझे दिग्दर्शित या नाट्य अभिवाचन कार्यक्रमात गजानन परांजपे, अमित वझे, कौस्तुभ देशपांडे, जयदीप वैद्य आणि अपर्णा केळकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.