विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

    26-Mar-2023
Total Views |
- पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत

Maha Budget Session 2023
(Image Source : Internet)
 
मुंबई :
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maha Budget 2023) शनिवारी राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार 17 जुलै 2023 रोजी मुंबईतील विधानभवन येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
विधानपरिषद कामकाज
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मिनिट झाले. सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती.
विधानसभा कामकाज
विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89% होती.
 
मुख्यमंत्र्यांनी मानले मुंबई पोलिसांचे आभार
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ ची शनिवारी यशस्वी सांगता झाली. या पार्श्वभूमीवर गेला जवळपास महिनाभर आपले कर्तव्य बजावत विधिमंडळाला सुरक्षा देणारे पोलिस, मुंबई पोलिस दलातील मला सुरक्षा देणारे विशेष सुरक्षा दल कर्मचारी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनापासून आभार मानले.
याशिवाय विधीमंडळात सर्व सदस्यांना चहापाणी देणारे विधिमंडळ उपहारगृहातील कर्मचारी यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. सर्व जणांच्या श्रमामुळे हे अधिवेशन अतिशय नियोजनबद्धरित्या पार पडू शकले त्याबद्दल या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देखील दिले.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.