VNIT मध्ये 28 रोजी मिलेट्सवर आधारित पाककला स्पर्धा

    26-Mar-2023
Total Views |

VNIT
 
 
नागपूर :
२०२३ हे वर्ष मिलेट्सचे (भरडधान्य) आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. मिलेट ॲक्शन ग्रुप व्हीएनआयटीमध्ये (VNIT) त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 28 मार्च 2023 रोजी दुपारी 4 वाजता व्हीएनआयटीमधील दुसऱ्या माळ्यावर मल्टी अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये 'मिलेट आधारित पाककला स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.
 
ही स्पर्धा महिला कर्मचाऱ्यांसाठी तसेच व्हीएनआयटी कुटुंबातील सदस्यांसाठी (अध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि कर्मचारी) यांच्यासाठी खुली आहे. मिलेटच्या अन्नातून मिळणाऱ्या पोषणमूल्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
 
प्रमुख पाहुण्या म्हणून वरदान (एनजीओ) च्या संचालिका पल्लवी पी. पडोळे उपस्थित राहणार असून 'विष्णू की रसोई' चे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.