पूर्ती सुपर बाजारचा भागीदार कोणी एक नाही, तर तुम्ही सर्वजण आहात - नितीन गडकरी

25 Mar 2023 17:21:48
- नितीन गडकरींच्या हस्ते पूर्ती सुपर बाजार येथे ३ नव्या सेक्शनचा शुभारंभ

Nitin Gadkari inaugurated 3 new section at purti super bazar (Image Source : Abhijeet Bharat)
 
नागपूर :
गेल्या २५ वर्षांपासून पूर्ती सुपर बाजार (Purti Super Bazar) आपल्या ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे. दैनंदिन जीवात आणि घरात लागणारी प्रत्येक वस्तू येथे कमीतकमी दरात उपलब्ध करून देण्याचा एच प्रयत्न असतो. ही पूर्ती कोण्या एखाद्याच्या मालकीची नाही, तर ही आम्ही, तुम्ही आणि येथील प्रत्येक ग्राहक या पुपूर्ती सुपर बाजारचा भागीदार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज म्हणाले. मनीष नगर स्थित पूर्ती सुपर बाजार येथे शनिवारी २५ मार्च रोजी ३ नव्या विभागांचे नितीन गडकरी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
 
गेली २५ वर्षे नागपूरातील चोखंदळ ग्राहकांच्या सर्व गरजा भागविणारा आणि सहकार तत्वावरील पूर्ती सुपर बाजाराला नेहमीच तत्पर सेवा व वाजवी दरात उत्कृष्ट दर्जाचा किराणा व अन्य सामानासाठी ग्राहकांची पहिली पसंती मिळाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वस्तू पुरविण्यासाठी पूर्ती नेहमीच प्रयत्नशील असते. नागपूरच्या कडक उन्हाळ्यात खास कॉटनच्या कपड्यांची मागणी लक्षात घेवून महिला वर्गासाठी खास कॉटन कुर्ती, पॅन्ट व ओढणी अशा विविध मनमोहक सेट्सच्या नव्या सेक्शनसह आकर्षक क्रॉकरी व लहान मुलांसाठी खेळणी अशा ३ नवीन सेक्शन्सचा बेस रोडस्थित जयंती नगरी ४ मधील शाखेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 
विविध साईजेस व उन्हाळ्यात आल्हाददायक वाटतील असे पेस्टल कलर्समध्ये कॉटनचे ड्रेस महिला वर्गाला निश्चितच आवडतील. आकर्षक रंगातील विविध प्रकारची खेळणी, सॉफ्ट टॉईजला चिमुकल्यांनी पसंती नक्की मिळेल. याशिवाय क्रॉकरीच्या चाहत्यांसाठी लोकप्रिय ब्रॅन्ड्सची अतिशय सुरेख क्रॉकरी येथे उपलब्ध आहे. 
 
ग्राहकांच्या गरजेनुसार विविध वस्तूंची आपूर्ती करण्याचा पूर्ती सुपर बाजारचा नेहमीच प्रयत्न असतो. यावेळी ग्राहकांची मागणी लक्षात घेवून महिलांसाठी खास उन्हाळ्यासाठी १०० टक्के कॉटनचे व आल्हाददायक रंगातल्या कपड्यांचा सेक्शन पूर्तीने सुरू केला आहे. तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी आणि आकर्षक क्रॉकरीही तुमच्या पसंतीस उतरेल, याची मला खात्री आहे, असे नितीन गडकरी यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी पूर्ती सुपर बाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर, सचिव राजीव हडप व कोषाध्यक्ष दिपक सप्तर्षी, संचालिका केतकी कासखेडीकर तसेच अन्य संचालक उपस्थित होते. याशिवाय या कार्यक्रमाला पूर्तीचा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
 
Powered By Sangraha 9.0