'Bawaal' ची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

22 Mar 2023 12:23:21

Bawaal
 
मुंबई :
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत 'बवाल' (Bawaal) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. बेस्ट हिंदी फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'छिछोरे' च्या यशानंतर साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी या चित्रपट निर्मात्यांचा 'बवाल' हा आगामी प्रोजेक्ट आहे. 'बवाल' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट पुरस्कार विजेती निर्माता-दिग्दर्शक जोडी या चित्रपटासाठी एकत्र आली आहे. तसेच, यामध्ये वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 6 ऑक्टोबर 2023 रोजी 'बवाल' हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी 'बवाल' ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका
 
Powered By Sangraha 9.0