INS सुजाता नौकेची मोझांबिकमधील मापुटो बंदराला भेट

    21-Mar-2023
Total Views |

INS Sujata
 (Image Source : PIB)
 
मापुटो :
नौदलाच्या दक्षिणकमांड अंतर्गत कोची येथील आयएनएस सुजाता (INS Sujata) या युद्धनौकेने परदेशातील तैनातीचा भाग म्हणून 19 ते 20 मार्च या काळात मोझांबिकमधील मापुटो बंदराला भेट दिली. मोझांबिक नौदलाचे वाद्यवृंद आणि पारंपरिक नृत्यासह युद्धनौकेचे बंदरावर स्वागत करण्यात आले. कॅप्टन नितीन कपूर, डीए प्रिटोरिया, कमांडंट एनआरएन शिवा बाबू, तटरक्षक दल (कोस्ट गार्ड अफ्लोट सपोर्ट टीम) आणि मोझांबिकन नौदलाचे कॅप्टन फ्लोरेंटिनो जोस नार्सिसो यावेळी उपस्थित होते.
आयएनएस सुजाताचे (INS Sujata) कमांडिंग ऑफिसर यांनी मोझांबिक नौदलाचे रिअर ॲडमिरल युजेनियो डायस दा सिल्वा मुआटुका, मोझांबिकन नौदलाचे कमांडर एनीस दा कॉन्सेकाओ कोमिचे यांची भेट घेतली. मापुटोचे महापौर अंकन बॅनर्जी, भारताचे उच्चायुक्त आणि इतर अनेक लष्करी तसेच नागरी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मोझांबिक नौदलाच्या सुमारे 40 कर्मचार्‍यांनी क्रॉस डेक प्रशिक्षणासाठी युद्धनौकेला भेट दिली. प्रशिक्षण सुविधा, डायव्हिंग ऑपरेशन्सची माहिती, व्हीबीएसएस, हलकी शस्त्रे, दृश्यात्मक संप्रेषण, यंत्रसामग्रीची देखभाल आणि जहाजावरील स्वच्छता यांचा याप्रशिक्षणात समावेश होता. दोन्ही नौदलाच्या जवानांनी मिळून सकाळचे योग सत्र, सॉकर सामना अशा विविध उपक्रमांमधे भाग घेतला. सुजाता जहाजावर स्वागत समारंभही आयोजित केला होता. यात अनेक भारतीय/मोझांबिकन मान्यवर/मुत्सद्दी सहभागी झाले.
आयएनएस सुजाताच्या (INS Sujata) मोझांबिकमधील मापुटो भेटीमुळे दोन्ही नौदलांमधील परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत झाले.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.