‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ पिढ्यांमधील फरक मजेशीरपणे दर्शवतो - अतुल कुलकर्णी

    21-Mar-2023
Total Views |

happy family conditions apply
 
मुंबई :
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओची ओरिजनल सिरीज ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ (Happy Family Conditions Apply) प्रदर्शित झाली आहे. दर्शक या गमतीशीर सिटकॉमचा आनंद घेत आहेत. तसेच, आपली उत्कृष्ट कथा, रिलेटेबल पात्रे आणि आपल्या विनोदी ह्युमरसह या सिरीजने प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित केले आहे.
ही सिरीज एका छताखाली रहात असलेल्या चार पिढ्यांच्या कुटुंबाची ओळख करून देणारी आहे. तसेच, प्रत्येकाची मते वेगळी असूनही एकमेकांना पाठिंबा देत हे कुटुंब एकत्र राहते. दरम्यान, देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेले अतुल कुलकर्णी यांना मनसुखलाल आणि हेमलता ढोलकिया यांचा जबाबदार मुलगा रमेश ढोलकियाच्या भूमिकेत पाहायला मिळेल जो सर्वांचे हित पाहत असतो.
‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ मधील पिढ्यांमधील फरक याबद्दल अतुल कुलकर्णी म्हणाले, 'नवीन पिढीतील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्यासोबत काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. त्यामुळे 'हॅप्पी फॅमिली'च्या सेटवरचा तो वेळ मला फार आवडला. नवी पिढी आज खूप सक्षम झाली असून माहिती आणि स्वातंत्र्याने त्यांना खूप आत्मविश्वास दिला आहे आणि ही एक उत्तम गोष्ट आहे. ही पिढी लोकांचा आदर करते. तसेच, आपल्याला काय आवडत आणि काय नाही आवडत या गोष्टींबद्दल खूप वोकल आहेत. मला असे वाटते की ही क्वालिटी आमच्या पिढीमध्ये कुठेतरी मिसिंग आहे, पण जेन झीच्या या स्पिरिटमुळे ते हार मानत नाहीत किंवा इतरांना तोडू देत नाहीत. तरुणांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ पिढ्यांमधील फरक अतिशय मजेशीरपणे दर्शवतो.”
 
आतिष कपाडियाद्वारा लिखित 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय' या सिरीजमध्ये स्वाती दास, अतुल कुमार, करियुकी मार्गरेट वांजीकू, परेश गनात्रा, प्रणोती प्रधान, समर वर्मन्नी आणि नेहा जुल्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.