नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; १० कोटींच्या खंडणीची मागणी

21 Mar 2023 18:44:21

Death threat to Nitin Gadkari
(Image Source : Internet)
 
नागपूर :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबाबत मंगळवारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूरमधील खामला स्थित ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी पुन्हा धमकीचे तीन फोन आले आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिस विभागाने पुन्हा जनसंपर्क कार्यालय गाठून तपास सुरू केला. यावेळीही बेळगाव कारागृहातील आरोपी जयेश कंठा याच्या नावाचे फोन येत असल्याची माहिती समोर आली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
नागपूचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी नावाच्या एका व्यक्तीचे तीन कॉल आले. हा नंबर मंगळुरू येथील एका महिलेचा असल्याचे आढळून आले आहे. आम्ही त्या महिलेशी देखील संवाद साधला, ती कार्यक्रम व्यवस्थापनात काम करते. हा कॉल तिच्या मित्राने केला की जयेश पुजारीने, याचा आम्ही शोध घेत आहोत.
कॉलवर असलेल्या व्यक्तीने सांगितले की, मागच्या वेळी त्याने 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र यावेळी त्यांना किमान 10 कोटी हवे आहेत. त्याने कोणत्याही जीवाला धोका दिला नाही, असेही राहुल मदने यांनी सांगितले.
 
हेही वाचा : धक्कादायक! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी
 
यापूर्वी नितीन गडकरी यांना 14 जानेवारी रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील लँडलाईनवर जीवे मागण्याची धमकी देणारे फोन आहे होते. त्यावेळी देखील आरोपीने १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणानंतर गडकरी यांच्या सुरक्षेत करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी पूर्वीच्या प्रकरणाचा तपास केला असता बेळगावी कारागृहातून जयेश पुजारी नावाच्या आरोपीला बोलावल्याचे प्रकरण समोर आले होते. कर्नाटकात 4 ते 5 दिवस मुक्काम केल्यानंतर पोलिसांचे पथकही आले होते. मात्र विशेष माहिती समोर आणता आली नाही. तरीही त्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0