चक्क BMW चालवणाऱ्या तरुणांनी चोरली C20 अंतर्गत लावलेली रोपे; बघा व्हिडिओ

    16-Mar-2023
Total Views |

Flower Plant
(Image Source : Abhijeet Bharat)
 
नागपूर :
G20 परिषदेअंतर्गत नागपुरात होऊ घातलेल्या नागरिसंस्थांच्या C20 परिषदेसाठी शहरात जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण शहराचे सुशोभीकरण आणि आकर्षक सजावट करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रंगरंगोटी, लायटींग, साजसजावत आणि वृक्षारोपण करण्यात येत आहे. अशातच चक्क महागड्या BMW फिरणाऱ्या तरुणांचा C20 अंतर्गत लावलेली रोपे चोरतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
 
वर्धा रोडवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण शहराच्या सजावटीसाठी लावलेली रोपे चोरताना दिसत आहेत. धक्कादायक बाबत म्हणजे हे तरुण रोपे चोरून चक्क BMW सारख्या उच्च श्रेणीच्या आणि महागड्या कारमध्ये ठेवताना दिसत आहेत. रोपे चोरणारे तरुण उच्चवर्गीय चोर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हा व्हिडिओ समोर येताच नागपूर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
G20 च्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणाऱ्या C20 बैठकीची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. उपराजधानी अतिशय सुंदर पद्धतीने सजवली जात आहे. सुशोभीकरणाच्या कामासोबतच विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे व रोपेही लावण्यात येत आहेत, जेणेकरून पाहुणे हे सौंदर्य पाहून आनंदित होतील. परंतु, काही नागरिकांवर त्यांच्या घराची बाग सजवण्यासाठी अशी झाडे चोरण्याची वेळ आली आहे.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.